scorecardresearch

पुणे: दारूच्या नशेत लावलेल्या आगीत २७ वाहने जळून भस्मसात

या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

पुणे: दारूच्या नशेत लावलेल्या आगीत २७ वाहने जळून भस्मसात
जनता वसाहत गल्ली क्र. ३८ येथील पोलीस चौकी शेजारी असणाऱ्या शौचालयाच्या बाजूस मोकळी जागा आहे. त्या ठिकाणी येथील रहिवासी आपली वाहने लावतात.

दारूच्या नशेत मोकळ्या जागेत लावलेल्या सुमारे २७ वाहने जाळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील जनता वसाहतमध्ये ही घटना घडली. दिनेश उर्फ झब्या हरी पाटील (वय २५) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून दारूच्या नशेत आपण हा प्रकार केल्याचे पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेशने दारूच्या नशेत रविवारी मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास जनता वसाहत गल्ली क्रमांक ३८ येथील पोलीस चौकी शेजारी मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या वाहनांना पेटवून दिले. तत्पूर्वी त्याने एका वाहनातील पेट्रोल काढून उभ्या असलेल्या वाहनांवर टाकवून ही वाहने पेटवून दिली. या आगीत एक टेम्पो, २४ दुचाकी आणि दोन सायकली आगीत जळून भस्मसात झाली. या आगीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या भागातील रस्ते लहान असून आगीने रौद्ररूप धारण केल्याने नागरिकांची एकच धावपळ झाली. सुरूवातीला आग कशामुळे लागली समजले नव्हते. पण नंतर तपासात दिनेशने आग लावल्याचे समोर आले. या घटनेचा तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-07-2017 at 10:31 IST

संबंधित बातम्या