scorecardresearch

Premium

पुणे: बाणेरमधील हाॅस्पिटलमधून अमेरिकन डॉलरसह ४ लाख ८२ हजार चोरले

नजर चूकवून कोणीतरी फिर्यादी रितेश शहा यांची बॅग लांबविली.

4 lakh 82 thousand american doller robbery baner pune hospital
बाणेरमधील हाॅस्पिटलमधून अमेरिकन डॉलरसह ४ लाख ८२ हजार चोरले (प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: बाणेर परिसरातील एका क्लिनिकमध्ये  डॉक्टरची नजर चूकवून अमेरिकन डॉलर आणि रोकड असा ४ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल असलेली बॅग चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

vibhor steel tubes make bumper debuts at a premium of 181 percent over issue price
विभोर स्टील ट्यूबचे दमदार पदार्पण; गुंतवणूकदारांना १९३ टक्क्यांच्या बहुप्रसवा परतावा
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : उद्योजकांना सवलती, शेतकऱ्यांच्या हाती धुपाटणे!
american attack
अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला; पत्नीचे परराष्ट्र मंत्र्यांना पत्र, विद्यार्थ्यांवर होणार्‍या हल्ल्याचे सत्र कधी थांबेल?
indian amerian students
अमेरिकेतील भारतीय विद्यार्थी भीतीच्या छायेत?

याबाबत रितेश शहा (४५, रा. बालेवाडी फाटा, बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, शहा यांचे बाणेर परिसरातील ऑर्चिड स्कूलशेजारी श्रद्धा पॉलिक्लिनिक नावाचे हॉस्पिटल आहे. शहा हे हॉस्पिटलमध्येच होते. यावेळी त्यांच्या बॅगेमध्ये  ४ लाख ८२ हजार रुपयांचे अमेरिकन डॉलर आणि रोकड होती.

हाेही वाचा… पिण्याच्या पाण्याचा अपव्यय केल्यास नळजोड तोडणार; पिंपरी- चिंचवड महापालिकेचा इशारा

त्यांची नजर चूकवून कोणीतरी त्यांची बॅग लांबविली. बॅग मिळून न आल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार अशोक वणवे तपास करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 4 lakh 82 thousand along with us dollars were stolen from a hospital in baner pune pune print news rbk 25 dvr

First published on: 21-04-2023 at 12:22 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×