पिंपरी-चिंचवडमध्ये एमबीबीएसच्या अभ्यासक्रमाकरीता मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतो असे सांगून ४५ लाखांची फसवणूक केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी किरण सुवर्णा आणि कॉलेज प्रमुख आयएसएनआर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना बेड्या ठोकल्यात आल्या आहेत. या प्रकरणी ४२ वर्षीय महिलेने फिर्याद नोंदवल्यानंतर कारवाई करण्यात आलीय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४२ वर्षीय महिलेच्या मुलीला एमबीबीएसच्या अभ्यासक्रमासाठी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा होता. त्यांना यासंदर्भातील काम करुन देतो असं सांगणाऱ्या या आरोपींचा मोबाईल नंबर मिळाल्यानंतर त्यांनी यावर संपर्क साधला. दोन्ही आरोपींनी फिर्यादींचा विश्वास संपादन केला. फिर्यादी महिलेने पैसे देऊन आपल्या मुलीचं मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचं निश्चित केलं. त्यानुसार या महिलेला ४५ लाख रुपयांमध्ये तुमच्या मुलीला मेडिकलसाठी प्रवेश मिळवून देऊ असं सांगण्यात आलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फिर्यादी महिलेने आरोपींवर विश्वास ठेवला आणि पहिल्यांदा १० लाख आणि दुसऱ्या वेळेस ३५ असे एकूण ४५ लाख रुपये आरोपींना दिल्याचा उल्लेख तक्रारीमध्ये आहे. मात्र एवढे पैसे देऊनही मुलीला प्रवेश न मिळाल्याने या महिलेला आपली आर्थिक फसवणूक झाल्याचं समजताच तिने आरोपींविरोधात तक्रार दिली आहे. दोन्ही आरोपींना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.