‘सेक्स रॅकेट’ चालविण्याच्या प्रकरणात अनेक गुन्हे दाखल असलेल्या कल्याणी देशपांडेकडून कोथरुडच्या भुसारी कॉलनीतील एका इमारतीत चालविला जाणारा वेश्याव्यवसाय उघडकीस आला आहे. या प्रकरणात उझबेकिस्तानमधील दोघींसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
अचिलोवा शहनाझा (वय ४३, रा. तश्केंत, उझबेकिस्तान), रवशोनोवा फरनगिझ (वय २१, रा. सुरखनदरिया, उझबेकिस्तान), गोपाळ विरबहादूर कोयराला (वय ३१, रा. मु.पो. मोगलदरी, जि. गुहाटी, आसाम), यास्मीन याकुब शेख (वय २७, रा. फ्लॅट क्र. १२, दानिश चाळ, मुंब्रा, नवी मुंबई), सोनाली रवींद्र सुर्वे (वय २१, रा. आर ६, मोतीलालनगर, गोरेगाव पश्चिम, मुंबई) अशी या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणी देशपांडे ही तिच्या हस्तकामार्फत कोथरूडमध्ये असलेल्या तिच्या सदनिकेमध्ये विदेशी व इतर मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी भुसारी कॉलनीतील खुशबू अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील पाच क्रमांकाच्या सदनिकेत छापा घातला. तेथे वेश्याव्यवसाय होत असल्याचे उघडकीस आले. तेथून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
वेश्याव्यवसाय प्रकरणात पकडलेल्या विदेशी मुलींकडे चौकशी केली असता, आपण कल्याणी देशपांडे हिच्याकडे आलो असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे कोयराला हा देशपांडे हिच्याकडे कामाला आहे. तो या व्यवसायात देशपांडे हिला मदत करीत होता. पाचही आरोपींवर पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Oct 2013 रोजी प्रकाशित
कल्याणी देशपांडेचे आणखी एक ‘सेक्स रॅकेट’ उघडकीस
‘सेक्स रॅकेट’ चालविण्याच्या प्रकरणात अनेक गुन्हे दाखल असलेल्या कल्याणी देशपांडेकडून कोथरुडच्या भुसारी कॉलनीतील एका इमारतीत चालविला जाणारा वेश्याव्यवसाय उघडकीस आला आहे.

First published on: 12-10-2013 at 02:44 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 arrested in sex racket from bhusari colony kothrud