करोना महासाथीच्या काळात बहुतांश विषाणूजन्य आजारांचे प्रमाण नियंत्रणात आल्याचे दिसून आले. मात्र, मलेरिया या कीटकजन्य आजाराचे प्रमाण करोना महामारी धोक्याच्या सर्वोच्च पातळीवर असतानाही नियमित राहिल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जागतिक मलेरिया अहवालातून समोर आले आहे. त्यामुळेच एका बाजूला मलेरिया निर्मूलनासाठी प्रयत्नशील असलेल्या जागतिक आरोग्य यंत्रणांसमोरील आव्हानही कायम राहिल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये भारतातील मलेरिया मृत्यूचे प्रमाण मात्र कमी झाल्याचे या अहवालातून समोर येत आहे.

हेही वाचा >>>पुणे: पिंपरी- चिंचवडमधील सोसायटीत शॉर्ट सर्किट; चार्जिंगला लावलेल्या १५ इलेक्ट्रीक बाईक जळून खाक

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
demat accounts touch 15 crore in march 2024
डिमॅट खाती पहिल्यांदाच १५ कोटींच्या पुढे
400 lakh crore market cap milestone of Mumbai Stock Exchange
विश्लेषण : ७५ हजारांचे शिखर… ४०० लाख कोटींचे बाजारभांडवल… शेअर बाजार आणखी किती तेजी दाखवणार?
HDFC Bank shares up 3 percent on rise in deposits loans
ठेवी, कर्जातील वाढीने एचडीएफसी बँक समभागाची ३ टक्क्यांनी झेप

जागतिक आरोग्य संघटनेकडून दरवर्षी वार्षिक मलेरिया अहवाल प्रसिद्ध केला जातो. यंदाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून त्यातून समोर आलेल्या माहितीनुसार २०२१ मध्ये मलेरिया या आजारामुळे सहा लाख १९ हजार मृत्यू झाल्याची नोंद जागतिक स्तरावर करण्यात आली आहे. २०२० मध्ये ही संख्या सुमारे सहा लाख २५ हजार एवढी नोंदवण्यात आली होती. मृत्यूच्या संख्येत घट दिसत असली तरी डेंग्यू, स्वाईन फ्लूसारख्या विषाणूजन्य आजारांप्रमाणे संसर्ग होण्याचे प्रमाण घटल्याचे चित्र मलेरियाबाबत दिसलेले नाही आणि ही बाब पुरेशी चिंताजनक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. करोना काळात जगभर लादण्यात आलेले प्रतिबंधात्मक निर्बंध, त्यातून नागरिकांच्या एकत्र येण्यावर आलेल्या मर्यादा अशा अनेक कारणांमुळे सर्व प्रकारच्या विषाणूजन्य आजारांच्या संसर्गाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याचे दिसून आले. एका विषाणूचा प्रभावी अंमल असताना इतर विषाणूंच्या प्रसाराची ताकद काहीशी सौम्य होत असल्याचेही यावेळी विविध स्तरावरील तज्ज्ञांकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, करोना महासाथीची तीव्रता अधिक असण्याच्या काळातही मलेरिया संसर्गाचे प्रमाण कायम राहणे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>चंद्रकांत पाटलांवरील शाईफेक: आरोपींवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा; तिघांना अटक, ११ पोलीस निलंबित

आव्हान काय?
गेल्य काही वर्षांमध्ये मनमानी औषधे घेण्याच्या नागरिकांच्या प्रवृत्तीमुळे, औषध विक्रीसाठी कडक नियम नसल्याने औषधे सहज उपलब्ध होतात. औषधांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृतीचा अभाव असल्याने गेल्या काही वर्षांमध्ये औषधांच्या विरोधातील प्रतिरोध (रेझिस्टन्स) वाढत आहे. त्याचा परिणाम म्हणून अनेक औषधे आजाराच्या लक्षणांना तसेच ते आजार निर्माण करणाऱ्या विषाणूंना कोणताही विरोध करत नसल्याचेही दिसून येत आहे. मलेरिया हा कीटकजन्य (डासांपासून पसरणारा) आजार असल्यामुळे डासांची पैदास रोखण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. डासांपासून बचावासाठी मच्छरदाण्यांचे वाटप करण्यासारख्या साध्या उपायांचा अवलंब नसणे ही मलेरिया रोखण्यातील प्रमुख आव्हाने असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.