पावसामुळे साठ झाडे पडली; चार ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना

रविवारी दिवसभर अग्निशामक दलाचा नियंत्रण कक्षातील दूरध्वनी खणखणात होता. दिवसभरात साठ ठिकाणी झाडे पडली.

संग्रहीत छायाचित्र

शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे साठ झाडे पडली. तर चार ठिकाणी विजेच्या खांबांवर शॉर्टसर्किट झाल्याच्या घटना घडल्या. एके ठिकाणी भिंत कोसळली. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने तेथे धाव घेऊन विविध ठिकाणी पडलेली झाडे बाजूला काढून रस्ते वाहतुकीसाठी खुले केले.
शहरात शनिवारपासून (२ जुलै) संततधार पाऊस सुरू झाला. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे विविध ठिकाणी झाडे, फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. रविवारी दिवसभर अग्निशामक दलाचा नियंत्रण कक्षातील दूरध्वनी खणखणात होता. दिवसभरात साठ ठिकाणी झाडे पडली. तर चार ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. एके ठिकाणी भिंत कोसळली. सुदैवाने या घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही. कोथरूडमधील करिश्मा सोसायटी, मंगळवार पेठ, कात्रज, सदाशिव पेठ, कोंढव्यातील एनआयबीएम रस्ता येथे वाहनांवर झाडे पडल्याच्या घटना घडल्या. करिश्मा सोसायटीच्या परिसरात असलेल्या एका उपाहारगृहाच्या समोर लावलेल्या दुचाकी वाहनांवर झाड पडले. एनआयबीएम रस्त्यावर झाड पडल्याने काही वेळ वाहतूककोंडी झाली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी तेथील झाडे बाजूला काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली, अशी माहिती अग्निशामक दलाने दिली.
भवानी पेठ, कोथरूड, कोंढवा येथे शॉर्टसर्किट झाल्याच्या घटना घडल्या. तर रविवार पेठेत एका वाडय़ाची भिंत कोसळली. सुदैवाने या घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही.

बाहय़वळण मार्गावर वाहतुकीची कोंडी
मुंबई-बंगळुरू बाहय़वळण मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. संततधार पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. बाहय़वळण मार्गावरील वारजे, चांदणी चौक, कात्रज, तसेच वाकड येथे वाहतुकीची कोंडी झाली होती. डुक्कर खिंड परिसरात डोंगर फोडून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे हा परिसर वाहनचालकांच्या दृष्टीने धोकादायक झाला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 60 trees collapse after heavy rain in pune