बावधन परिसरातील ६७ वर्षीय एका व्यक्तीला झिका विषाणूची लागण झाली आहे. उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. हे व्यक्ती बावधन परिसरातील रहिवासी आहे.

हेही वाचा- पिंपरीः एसकेएफ कंपनीच्या उपव्यवस्थापकाला ४८ लाखांच्या अपहार प्रकरणी अटक

या रुग्णाला १६ नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ताप, खोकला, थकवा आणि सांधेदुखी या कारणांसाठी ही व्यक्ती बाह्यरुग्ण विभागात वैद्यकीय सल्ल्यासाठी आली होती. खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेला हा रुग्ण १८ नोव्हेंबर रोजी झिका बाधित असल्याचे सिद्ध झाले होते. त्यानंतर ३० न रोजी राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या (एनआयव्ही) तपासणीत रुग्ण झिका बाधित असल्याचे निश्चित झाले. २२ नोव्हेंबर रोजी महापालिकेच्यावतीने या भागात रोग नियंत्रण उपाययोजना करण्यात आली.

रुग्णाच्या परिसरातील घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात एकही संशयित रुग्ण आढळला नाही. या भागात घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले. त्यावेळी या भागात एडीस डास असल्याचे आढळून आले नाही. या भागात धूरफवारणी देखील करण्यात आली आहे.

हेही वाचा- पिंपरी-चिंचवडकरांच्या हिताच्या प्रकल्पांना ‘राष्ट्रवादी’कडून खोडा; भाजपाचा आरोप

रुग्ण मूळचा नाशिकचा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

झिकाबाधित रुग्ण हा मूळचा नाशिकचा आहे. ते ६ नोव्हेंबर रोजी पुण्यात आले होते. त्यापूर्वी ऑक्टोबरमध्ये ते सूरत येथे गेले होते. सध्या हा रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे आणि त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांंगितले आहे.