१० हजारांपेक्षा अधिक रोजगार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : उद्योग विभागाच्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या दुसऱ्या पर्वात पुणे व परिसरात तब्बल सात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्या माध्यमातून पुण्यात १० हजारांपेक्षा अधिक रोजगार निर्माण होणार आहेत. तर, या येणाऱ्या उद्योगांना पूरक असणाऱ्या छोटय़ा उद्योगांमधूनही मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहेत.

सोमवारी झालेल्या सामंजस्य करारांबाबत विस्तृत माहिती अद्याप पुणे विभागाच्या सहसंचालक कार्यालयाकडे आलेली नाही. विभागाच्या आयुक्तांकडून लवकरच ही माहिती प्राप्त होईल. या उद्योगांना स्थानिक पातळीवर येणाऱ्या अडचणींबाबत आगामी काळात आढावा घेतला जाईल. या सामंजस्य करारांनुसार दहा हजारांपेक्षा जास्त रोजगार पुण्यात उपलब्ध होणार आहे. तसेच या उद्योगांना पूरक इतर उद्योगांमधूनही मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. करोनाच्या पाश्र्वभूमीवर ही येणारी गुंतवणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

याबाबत माहिती देताना उद्योग पुणे विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे म्हणाले, ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत सोमवारी जगभरातील विविध कं पन्यांशी करण्यात आलेल्या सामंजस्य करारांपैकी सहा करार पुणे व परिसराशी निगडित आहेत. त्यानुसार सात हजार कोटींची गुंतवणूक पुणे जिल्ह्य़ात होणार आहे. या करारांपैकी ग्रेटवॉल मोटर्स या प्रकल्प पुण्यासाठी महत्त्वाचा ठरणार असून त्यातून रोजगारनिर्मिती, आर्थिकदृष्टय़ा फायदेशीर ठरेल. कारण ही इलेक्ट्रिक वाहने तयार करणारी चीनमधील आघाडीची कं पनी आहे. या कं पनीला पुणे जिल्ह्य़ात यापूर्वीच जागा देण्यात आली होती. मात्र, तांत्रिक व आर्थिक अडचणींमुळे व्यावसायिक वाहने उत्पादनांचा हा प्रकल्प होऊ शकला नाही. मात्र, या कं पनीने पुन्हा पुण्यालाच पसंती दिली असून या कं पनीचा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास पुण्यातील उद्योग विश्वासाठी आश्वासक बाब ठरू शके ल. पुण्यात ऑटोमोबाइल इंडस्ट्रीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा असून या उद्योगांसाठीचे पूरक उद्योगही आहेत, तसेच या उद्योगासाठी आवश्यक कौशल्याधारित मनुष्यबळ उपलब्ध आहे.’

पुण्याला मोठय़ा प्रमाणावर फायदा

सिंगापूरचा असेंडास समूह पुण्यामध्ये पायाभूत सुविधा व दळणवळण यामध्ये यापूर्वीपासून कार्यरत आहे. तर, चीनच्या ग्रेटवॉल व पीएमआय इलेक्ट्रो या ऑटोमोबाइल क्षेत्रातील कं पन्या येत आहेत. रांजणगाव येथे इलेट्रॉनिक डिझाइन सिस्टीम ही दक्षिण कोरियाची कं पनी देखील येत आहे. वरुण बिव्हरिजेस कं पनीचा अन्न प्रक्रियाबाबतचा प्रकल्प सुपा येथे होणार असला, तरी पुणे जिल्ह्य़ाला लागून असल्याने त्याचा फायदाही पुण्यालाच मोठय़ा प्रमाणावर होणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 00 crore investment in pune under magnetic maharashtra zws
First published on: 17-06-2020 at 01:29 IST