पुणे : शिक्षण प्रसारक मंडळीच्या एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अखंड भारताचे १५ फूट लांब, दहा फूट रुंदीचे नकाशारूपी मानचित्र साकारण्यात आले आहे. हा त्रिमितीय स्वरूपातील असल्यामुळे विद्यार्थी भारताच्या प्राचीन रूपासह इतिहासात झालेल्या वेगवेगळय़ा विभाजनांपूर्वी प्राचीन भारतातील प्रदेश, त्यांची पूर्वीची नावे पाहू शकतात. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते या नकाशाचे अनावरण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. के. जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, शाळा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. मिहीर प्रभुदेसाई या वेळी उपस्थित होते. अ‍ॅड. मिहीर प्रभुदेसाई यांच्या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी शिवसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे, बकेट डीझाईन या डिझाइन स्टुडिओ हृषीकेश राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चार महिने संशोधन करून तीन महिन्यांत नकाशाची निर्मिती करण्यात आली. त्रिमितीय नकाशामुळे भारताच्या भूभागासह सर्व डोंगररांगा, पठारे, नद्या, समुद्र जसेच्या तसे पाहता येतात.  भगतसिंग कोश्यारी म्हणाले, अखंड भारत आपण प्रत्यक्षात पाहिलेला नाही, पण नकाशामुळे तो पाहता येतो. आजपर्यंत कोणत्याही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अशाप्रकारे अखंड भारताचा नकाशा मी पाहिलेला नाही. या नकाशाद्वारे भारताचा गौरवपूर्ण इतिहास भूगोलाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत जाईल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A map akhand bharat at a school pune inaugurated by governor koshyari ysh
First published on: 13-10-2022 at 00:02 IST