मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तुंगार्ली गावाजवळ ट्रकवर मोटार आदळून तरुणाचा मृत्यू झाला. अपघातात तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दीपक अशोक नाटक (वय २७, रा. तळेगाव दाभाडे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. अपघातात राहुल कैलास जाधव (वय २८), जालिंदर बापू पवार (वय ५१), राेहन भगवान वाघमारे (वय २८, तिघे रा. पिंपरी) जखमी झाले आहेत.

हेही वाचा- पुणे : सिमेंट पाइप तयार करणाऱ्या कंपनीच्या हौदात पडून दोन वर्षांच्या बालिकेचा मृत्यू

दीपक, त्याचे मित्र राहुल, जालिंदर, रोहन मोटारीतून सोमवारी (२ जानेवारी) सकाळी सातच्या सुमारास द्रुतगती मार्गावरुन तळेगावकडे निघाले होते. त्या वेळी तुंगार्ली गावाजवळ एका अवजड ट्रकवर मोटार आदळली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चौघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वी दीपकचा मृत्यू झाला.