प्रेमप्रकरणाच्या संशयातून तरुणाचा पाण्याच्या टाकीत ढकलून देऊन खून केल्याच्या आरोपावरुन पावणे दोन वर्षांनी गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणाच्या आईने याबाबत न्यायालयात खासगी फाैजदारी दावा दाखल केला होता. न्यायालयाच्या आदेशाने या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला .

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>काय सांगता? पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर नियम तोडणाऱ्यांची घेतली जाते दहा गुणांची परीक्षा

निरंजन महादेव काटकर (वय २३, रा. सुंदरबन सोसायटी, फुरसुंगी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी निरंजनची आई अरुणा महादेव काटकर (वय ४२, रा. सुंदरबन सोसायटी, फुरसुंगी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी बिभीषण माने, संजय हरिचंद्र माने, सचिन दगडु खोचरे, हनुमंत अंकुश कलढाणे (रा. गंगानगर, फुरसुंगी) यांच्यासह दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर भागातील फुरसुंगी परिसरात नियोजित स्वराज पार्क या गृहप्रकल्पाच्या टाकीत तीन एप्रिल २०२१ रोजी निरंजन काटकर मृतावस्थेत सापडला होता. शवविच्छेदन अहवालात डाॅक्टरांनी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे नमूद केले होते. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर बिडवे, उपनिरीक्षक अमृता काटे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला होता.

हेही वाचा >>>पुणे: ऋण वसुली न्यायाधिकरणाकडून आयोजित लोकन्यायालयात ६०४ कोटी रुपयांची वसुली; २३० खटले तडतोडीत निकाली

निरंजन याचे एका तरुणीबरोबर प्रेमसंबंध होते. या कारणावरुन आरोपींनी त्याला पाण्याच्या टाकीत बुडवून त्याचा खून केला, असा संशय त्याच्या आईला होता. त्यानंतर आईने न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आईने खासगी फाैजदारी दाव्यात केली होती. त्यानुसार न्यायालयाने १५६ (३) प्रमाणे खूनाचा गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश लोणी काळभोर पोलिसांना दिले. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A young man was killed by being pushed into a water tank on suspicion of having an affair pune print news rbk 25 amy
First published on: 27-12-2022 at 16:09 IST