पुणे : बिग बॉस फेम अभिनेता अभिजीत बिचुकले याच्या मोटारीला अपघात झाला. बिचुकले याच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्याला सोडण्यात आले. डॉक्टरांनी बिचुकले याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिचुकले मूळचा साताऱ्यातील असून सध्या तो पुण्यात व्यवसायानिमित्त स्थायिक झाला आहे. मंगळवारी दुपारी त्याच्या मोटारीचा किरकोळ अपघात झाला. त्या वेळी त्याच्या बरोबर चार मित्र होते. बिचुकलेच्या डोक्याला दुखापत झाली आहे. बिचुकलेच्या मित्रांनाही दुखापत झाली आहे. दरम्यान, बिचुकले यांच्याशी संपर्क साधला असता त्याने सुखरुप असल्याचे सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhijeet bichukle car accident in pune injured in head pune print news rbk25 rmm
First published on: 10-01-2023 at 22:45 IST