scorecardresearch

पोलीस कर्मचारी बाथरुमला गेला असताना लॉकपमधून आरोपीने ठोकली धूम; घरफोडी केल्याप्रकरणी केली होती अटक

सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली असून पोलीस स्टेशनमधील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

accused escaped from the lockup of Chakan police station

पोलीस ठाण्यातून जेरबंद असलेला आरोपी लॉकपमधून फरार झाल्याची घटना चाकणमध्ये घडली आहे. लोखंडी गजांच्यामधून आरोपीने धूम ठोकली होती. कुणाल बाळू वीर असे आरोपीचे नाव असून त्याला घरफोडी प्रकरणी अटक करण्यात आली होती. आरोपीने पलायन केल्याचे कळताच चाकण पोलिसांनी शोध घेऊन दोन तासांत पुन्हा त्याला जेरबंद केलं आहे. सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली असून चाकण पोलीस स्टेशनमधील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

कुणाल वीर या आरोपीला घरफोडी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला लॉकपमध्ये ठेवण्यात आलं होतं. सकाळी साडेसातच्या सुमारास अंमलदार बाथरूमला गेले असताना अंगाने सडपातळ असलेल्या कुणालने दोन्ही गजांच्या मधून बाहेर पडत धूम ठोकली. दरम्यान, कुणाल लॉकपमधून पळून गेल्याचे समजताच चाकण पोलिसांनी शोध सुरू केला आणि दोन तासांच्या प्रयत्नानंतर त्याला पुन्हा जेरबंद करण्यात यश आलं आहे. 

दरम्यान, या घटनेनंतर चाकण पोलिसांनी आरोपी कुणाल लॉकअपमधून कसा पळून गेलास याचा डेमो करून दाखवण्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास शिनगारे आणि गुन्हे पोलीस निरीक्षक देवरे यांनी सांगितले. त्यानंतर कुणालने बाहेर पडल्याचे प्रात्यक्षिक पोलिसांना दाखवले. त्यामुळे आता गंभीर गुन्ह्यातील आरोपी असतानाही अशी चूक झाल्याने संबंधित अंमलदार याच्यावर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Accused escaped from the lockup of chakan police station abn 97 kjp