पुणे : पुण्यातील शिवाजीनगर येथील शाळेत ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर काही तासाच्या आतमध्ये आरोपीला पकडण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे. मंगेश पदमुळू वय ३६ असे आरोपीचे नाव आहे.

शिवाजीनगर येथील एका शाळेत काल दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास एक मुलगी शाळेमध्ये गेली होती. त्यावेळी ३६ वर्षीय अनोळखी व्यक्ती तुला मी ओळखतो असे सांगून शाळेच्या बाथरूम नेऊन, तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली.या घटने बाबत कोणाला काही सांगितल्यास तुला बघतो,अशी धमकी दिली.त्यानंतर त्या मुलीने कुटुंबियांना माहिती दिली.त्या मुलीने दिलेल्या तक्रारी नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर पीडित मुलीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले.आता तिची तब्येत ठीक असून आरोपीपर्यंत लवकरात लवकर पोहोचण्याच्या दृष्टीने पोलिसांनी पीडित मुलीच्या मदतीने तिने सांगितलेल्या वर्णनानुसार, एक रेखाचित्र तयार केले आहे. या रेखाचित्रमधील व्यक्ती आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ कळविण्यात यावे,असे आवाहन देखील करण्यात आले.तर या सर्व घडामोडी दरम्यान या घटनेचे पडसाद विधानसभेत देखील उलटले. या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी शहर आणि आसपासच्या भागात पथके रवाना केली होती. त्याच दरम्यान शाळा परिसरातील सीसीटीव्हीमधून आरोपीचा शोध घेण्यात आला.तेव्हा एक आरोपी संशयितरित्या तिथे फिरताना दिसला. आरोपी ज्या मार्गाने जात होता.त्यानुसार शोध घेतल्यावर शिवाजीनगर भागातील पांडवनगर मधील एका दारूच्या दुकानातून आरोपी मंगेश पदमुळू या आरोपीला ताब्यात घेतले. या आरोपीला पोलिसी खाक्या दाखवताच,त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे अधिक चौकशी सुरू असल्याचे शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“एका ११ वर्षीय मुलीवर मंगेश पदमुळू या ३६ वर्षीय आरोपीने तिच्या शाळेत काल दुपारच्या सुमारास लैंगिक अत्याचार केला.या घटनेनंतर पीडित मुलीने आमच्याकडे तक्रार दिल्यानंतर,तात्काळ विविध पथकाच्या माध्यमातून तपास सुरू केला असता शाळेच्या आसपासच्या सीसीटीव्हीमध्ये एक संशयित आरोपी दिसून आला. तो पांडवनगर भागात दिसून आल्यावर त्या आरोपीला आम्ही ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी हा पीडित मुलीच्या दूरच्या नात्यातील आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे,” अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांनी दिली आहे.