पदपथांवर अतिक्रमण केल्यास कारवाई

पिंपरी -नेहरूनगर (क) क्षेत्रीय कार्यालयाच्या लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते.

पिंपरी : पदपथांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करावी, ताब्यात आलेल्या आरक्षित जमिनींवर अतिक्रमण होऊ नये, याची अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे आदेश पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.

पिंपरी -नेहरूनगर (क) क्षेत्रीय कार्यालयाच्या लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. प्रभाग अध्यक्ष राजेंद्र लांडगे, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. औद्योगिक भागातील रस्त्यांचे डांबरीकरण, सुरळीत पाणीपुरवठा, नालेसफाई, रस्ते विकास तसेच धोकादायक विजेच्या तारांचा बंदोबस्त आणि धोकादायक झाडांची छाटणी करावी, असे आयुक्तांनी यावेळी सूचित केले.

पिंपरी पालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाची बैठक आयुक्त राजेश पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Action case encroachment sidewalks ssh

ताज्या बातम्या