न्यायालयाच्या आदेशानंतर आजपासून फलकांवर कारवाई

शहरातील अनधिकृत जाहिरात फलक चोवीस तासांच्या आत काढून टाकण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी दिल्यानंतर पुणे महापालिकेतर्फे अनधिकृत फलकांवरील कारवाई गुरुवारी सकाळी आठपासून सुरू केली जाणार आहे. अनधिकृत जाहिरात फलकांबाबत न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीत राज्यातील मुख्य शहरांमधील (पुण्यासह) सर्व अनधिकृत जाहिरात फलक काढण्याची कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून त्याची माहिती महापालिकेचे वकील अॅड. अभिजित कुलकर्णी यांनी प्रशासनाला सायंकाळी दिली.

शहरातील अनधिकृत जाहिरात फलक चोवीस तासांच्या आत काढून टाकण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी दिल्यानंतर पुणे महापालिकेतर्फे अनधिकृत फलकांवरील कारवाई गुरुवारी सकाळी आठपासून सुरू केली जाणार आहे.
अनधिकृत जाहिरात फलकांबाबत न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीत राज्यातील मुख्य शहरांमधील (पुण्यासह) सर्व अनधिकृत जाहिरात फलक काढण्याची कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून त्याची माहिती महापालिकेचे वकील अॅड. अभिजित कुलकर्णी यांनी प्रशासनाला सायंकाळी दिली. त्यानुसार महापालिका प्रशासनाने गुरुवार सकाळी आठपासून ही कारवाई सुरू करण्याचे नियोजन केले आहे.
महापालिकेचे सर्व सहायक आयुक्त तसेच क्षेत्रीय अधिकारी, अतिक्रमण निरीक्षक यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई सुरू होईल. त्यासाठी आवश्यक असलेले बिगारी सेवक, पोलीस कर्मचारी, बहुउद्देशीय पथकातील कर्मचारी यांची मदत घेतली जाईल. तसेच यंत्रसामग्री वगैरेचीही व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या फलकांवर कारवाई केली जाणार आहे त्या फलकाचे कारवाईपूर्वीचे व कारवाईनंतरचे छायाचित्रही घेतले जाणार आहे. सायंकाळी सात पर्यंत ही माहिती अतिक्रमण विभागाकडे कळवावी असे सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Action on hoarding from today after courts order

Next Story
राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदासाठी काकडे, निकम, पाटील यांची चर्चा
ताज्या बातम्या