शिक्षण हक्क कायद्यातील पंचवीस टक्क्य़ांच्या जागा रिक्त राहिल्या की ‘राखीव जागांवर प्रवेश घ्यायला पालक पुढे येत नाहीत,’ हे वर्षांनुवषे चालणारे कारण यावर्षी मात्र शिक्षण विभागाला बदलावे लागणार आहे. यावर्षी प्रवेश क्षमतेच्या दुप्पट अर्ज आले आहेत. शहरातील ७ हजार ९०० जागांसाठी १५ हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. अर्ज भरण्यासाठी विभागाने मुदतवाढ दिली आहे.
गेले दोन वर्षे पंचवीस टक्के राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. एकूण प्रवेश क्षमतेपैकी पन्नास टक्के जागांवरील प्रवेशही होत नाहीत. अशावेळी ‘पालकच पुढे येत नाहीत,’ असे कारण शिक्षण विभागाकडून देण्यात येत होते. यावर्षी मात्र प्रवेश प्रक्रियेला पालकांकडून मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडमधील एकूण प्रवेश क्षमतेच्या दुप्पट प्रवेश अर्ज विभागाकडे आले आहेत. पुणे, िपपरी चिंचवड येथील शाळांसह १३ तालुक्यांतील एकूण ७८१ शाळांनी प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केली आहे. या सर्व शाळांमध्ये मिळून ७ हजार ९०० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. यासाठी सोमवार सायंकाळपर्यंत शिक्षण विभागाकडे १५ हजार ९४० अर्ज आले आहेत. अर्जाची ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरात प्रवेश मिळणार का
पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील शाळांची प्रवेश क्षमता ४ हजार ९४३ आहे. त्यामध्ये पूर्वप्राथमिकसाठी २ हजार ५९३ आणि पहिलीसाठी २ हजार ३५० जागा उपलब्ध आहेत. मात्र शहरातून आलेल्या अर्जाची संख्याही अधिक असते. त्याचप्रमाणे पालकांचा ओढा पूर्वप्राथमिक वर्गापासून प्रवेश घेण्यासाठी असतो, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पूर्वप्राथमिक वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया अटीतटीची होण्याचीच शक्यता आहे. त्याचवेळी काही भागांतील शाळांमधील जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.

अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ
पंचवीस टक्क्य़ांचे प्रवेश अर्ज भरण्यासाठी सोमवापर्यंत (२५ एप्रिल) मुदत देण्यात आली होती. मात्र कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी पालक आणि संघटनांकडून करण्यात येत होती. त्या पाश्र्वभूमीवर शिक्षण विभागाने अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली असून आता २८ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. प्रवेश अर्ज भरल्यानंतर तो ‘कन्फर्म’ करणे, अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे आणि छायाचित्र अपलोड करणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज, मदतकेंद्रांची यादी आणि प्रवेश प्रक्रियेसंबंधीची अधिक माहिती rte25admission.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Admission forms regarding 25 reservation quota
First published on: 26-04-2016 at 03:10 IST