भारतीय शेतीसमोर असलेली विविध प्रकारची आव्हाने पेलण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाला सामोरे जायचे की परंपरागत पद्धतीनेच शेती करायची, या प्रश्नावर सध्या देशात चर्चा सुरू आहे. ‘लोकसत्ता’ने त्याच्या अनुषंगाने ‘शेती आणि नवे तंत्रज्ञान’ या विषयावर येत्या गुरुवारी, २१ ऑगस्ट रोजी पुण्यात विशेष चर्चेचे आयोजन केले आहे. ‘फिनोलेक्स पाइप्स’ हे या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत.
राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅन्ड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) व महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ (एमएआयडीसी) यांचे या कार्यक्रमाला सहकार्य लाभले आहे. त्याचबरोबर इंडियन ऑइल आणि भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) हे कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत.शेतीच्या विषयातील नामवंत तज्ज्ञ या चर्चेत सहभागी होणार असून, हा कार्यक्रम निवडक निमंत्रितांसाठीच खुला ठेवण्यात आला आहे. शेतीमधील संशोधन करणाऱ्या अ‍ॅप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिटय़ूट (आरती) या संस्थेचे अध्यक्ष डॉ. आनंद कर्वे, राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अ‍ॅग्रिकल्चरल बॉटनी या विषयाचे प्राध्यापक डॉ. अशोकराव जाधव यांच्याबरोबर महाराष्ट्राचे कृषी सचिव सुधीरकुमार गोयल या चर्चेत सहभागी होणार आहेत. केवळ निमंत्रणाच्या आधारेच प्रवेश दिला जाणार आहे. सकाळी ११ ते ६ या वेळात ०२०-६७२४११२४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agriculture and new technology
First published on: 20-08-2014 at 07:53 IST