मुंबई : इटलीमधील रेमिनी शहरात ‘मॅकफ्रुट-२०२५’ या कृषी विषयक प्रदर्शनाला भेट देण्यासाठी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, पणन मंत्री जयकुमार रावल, कृषी राज्यमंत्री आशीष जयस्वाल हे शनिवारी इटालीला रवाना होत आहेत. रेमिनी येथे ४ ते ९ मे या काळात कृषी विषयक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मॅकफ्रुट २०२५’ हे जगातील एक प्रमुख आंतरराष्ट्रीय फळे आणि भाजीपाला प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि विपणन प्रदर्शन आहे. या प्रदर्शनातून फळे, भाजीपाला विषयक जागतिक संधी समजून येतात. राज्यातील मंत्र्यांचे शिष्टमंडळ या प्रदर्शनाला भेट देईल. इटलीतील भारतीय दूतावास, तेथील चेंबर्स ऑफ कॉमर्स, आयातदार व वितरकांच्या प्रतिनिधींबरोबर व्यावसायिक बैठकांचे आयोजन केले जाणार आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाच्या निधीतून या दौऱ्याचा खर्च केला जाणार आहे.
मंत्री कोकाटे; रावल, जयस्वाल परदेश दौऱ्यावर
रेमिनी येथे ४ ते ९ मे या काळात कृषी विषयक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 02-05-2025 at 22:16 IST | © The Indian Express (P) Ltd
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agriculture minister manikrao kokate and marketing minister jayakumar rawal will visit italy to visit the agricultural exhibition macfruit 2025 pune print news phm 00