मराठा समाजाच्या आरक्षणाचा देण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यातील इतर आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देता येईल. मात्र, निवडणुका डोळ्यासमोर असल्याने भाजप सरकार मराठा आरक्षणाबाबत स्पष्ट भूमिका घेत नसून डबलगेम करत असल्याचा आरोप, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.
पवार म्हणाले की, मराठा समाजासाठी आरक्षण या मागण्यांसाठी मराठा समाज मोर्चे काढण्यात आले. २०१६ हे वर्ष या मोर्चांनी ढवळून निघाले होते. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेतली जाते. मात्र, मराठा समाजाला आरक्षण काही मिळत नसल्याची टीकाही त्यांनी केली. त्याचबरोबर भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर मराठा आरक्षण न्यायालयात टिकले नाही. केंद्र आणि राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका घेत नाही. मराठा समाजाच्या संवेदनशीलतेचा अंत सरकारने आता न पाहता आरक्षण द्यावे अशी मागणी ही त्यांनी केली.