अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये दोन महिन्यांपूर्वी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे. तेव्हापासून शरद पवार गट आणि अजित पवार गटामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

अशात आज ( १५ सप्टेंबर ) पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नियामक मंडळाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे. या बैठकीला अजित पवार उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासमोर येणं जाणीवपूर्वक टाळलं का? असा सवाल उपस्थित होत आहे. यावर मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भाष्य केलं आहे. ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नियामक मंडळाच्या बैठकीपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा : या सरकारचं थाटामाटात अंत्यसंस्कार करणार”, संजय राऊतांचं वक्तव्य; म्हणाले, “तीन तासांसाठी…”

दिलीप वळसे-पाटील म्हणाले, “अशी माहिती माझ्यापर्यंत नाही आहे. अजित पवार येतील असं कळलं आहे. ऐनवेळी काही कामानिमित्त बाहेरही गेले असतील. गेल्यावेळी एक सेमिनार आयोजित करण्यात आलं होतं. तेव्हा शरद पवार उपस्थित होते. सर्व संचालकांना बोलावण्यात आले नव्हतं. त्यामुळे मागीलवेळी अजित पवार उपस्थित नव्हते.”

हेही वाचा : “कुठे गेल्या गायी-म्हशी? गोमांसभक्षक संघ कार्यकर्त्यांकडे…”, संजय राऊतांचं सरकारवर टीकास्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंबेगावात शरद पवार यांची सभा होणार आहे. याबद्दल विचारल्यावर दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटलं, “आंबेगाव येथे शरद पवार यांची सभा झाली, तर आनंदच आहे. सभेला कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आदेश मी दिले आहेत. तसेच, शरद पवारांच्या स्वागताला मी देखील जाईन.”