सध्या सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांचा निषेध आणि जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी पिंपरीत सर्वपक्षीय नेत्यांची रॅली काढण्यात आली. यामध्ये विविध संस्था, संघटना तसेच तरुणाईने सहभाग घेतला.
चिंचवड स्टेशन येथील शहीद लहुजी यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या या रॅलीचा समारोप पिंपरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात करण्यात आला. महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते रॅलीची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मोरेश्वर शेडगे, मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सचिन चिखले, नगरसेवक विनायक गायकवाड, प्रसाद शेट्टी, शीतल शिंदे, गणेश लोंढे, हर्षल ढोरे, अजीज शेख, बाबा कांबळे, हमीद शेख आदी सहभागी झाले होते. रॅलीनंतर चौकात निषेध सभा घेण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजन विनायक गायकवाड, तुषार हिंगे, विजय ढुमे यांनी केले होते.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jan 2016 रोजी प्रकाशित
दहशतवादाच्या विरोधात पिंपरीत सर्वपक्षीय रॅली
सध्या सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांचा निषेध आणि जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी पिंपरीत सर्वपक्षीय नेत्यांची रॅली काढण्यात आली.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 26-01-2016 at 03:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All party rally against terrorism