पुणे शहारसह जिल्हाभरात दोन दिवसांपासून कायम सुरू असलेल्या पावसानंतर आता आणखी दोन दिवस अतिवृष्टी राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. शिवाय या कालावधीत गोवा आणि महाराष्ट्र किनारपट्टीवरील वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ६० किलोमीटर राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा तसेच महाविद्यालयांना सोमवार दि. ५ ऑगस्ट रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे.

मागील काही दिवसात पुणे जिल्ह्यात होणारा मुसळधार पाऊस पाहता तसेच धरण व नद्यांची सद्यस्थिती पाहता कोणताही अनुचित प्रकार घडू नये व याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसू नये यासाठी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्याल यांना सुटी देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला आहे. मावळ, जुन्नर, भोर, मुळशी आणि वेल्हा या तालुक्यातील शाळांना देखील सुट्टी जाहीर केली गेली आहे.