पुण्यातील भाजप नगरसेवक अमोल बालवडकर यांना वाहतूक पोलिसांना दमदाटी केली होती. त्या प्रकरणात त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. जामीन मिळण्यासाठी काल अर्ज करण्यात आला होता. मात्र तो अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. आज अखेर न्यायालयाने  त्यांचा अर्ज मंजूर केला. जंगली महाराज मंदिरासमोरील पार्किंगमध्ये चारचाकी उभी केल्याने वाहतूक पोलिसांनी अमोल बालवडकर यांच्या गाडीला जॅमर लावून कारवाई केली होती. आपल्या वाहनावर कारवाई का केली असे विचारत त्यांनी पोलिसांनी दमदाटी केली होती.  याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक देखील करण्यात आली होती.  आज न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला आहे.