नासाने प्रक्षेपित केलेल्या उपग्रहाच्या निर्मितीत आनंद ललवाणी यांचा सहभाग

पुणे : इक्विसॅट उपग्रहाची निर्मिती करीत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र त्यावर मात करून आमच्या गटाने या उपग्रहाची यशस्वी निर्मिती केली याचा आम्हाला विशेष आनंद आहे, अशी भावना नासाने प्रक्षेपित केलेल्या इक्विसॅट या उपग्रहाच्या निर्मितीत सहभागी असलेल्या आनंद ललवाणी याने बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

mangal gochar 2024 mars and jupiter make parivartan yog these zodiac sign will be shine
गुरु-मंगळ निर्माण करणार शक्तीशाली ‘परिवर्तन राजयोग’, या राशीचे लोक होतील मालामाल
Loksatta kutuhal Artificial intelligence Technology The Turing Test Mirror test
कुतूहल: स्वजाणिवेच्या पात्रता कसोट्या
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

इक्विसॅट उपग्रहाच्या निर्मितीबद्दलची माहिती आनंदने सांगितली. डॉ वासुदेव गाडे, अभय छाजेड, आनंद ललवाणीचे वडील विकास, आई संगीता यांची यावेळी उपस्थिती होती. आनंद म्हणाला, या उपग्रहाची निर्मिती करतानाचे विशेष म्हणजे अनेक गोष्टींचा पुनर्वापर आम्ही केला आहे. आम्ही तयार केलेल्या या उपग्रहाला अत्युच्च क्षमतेचे  सौरऊ र्जेवर चालणारे एलईडी बसविण्यात आले असून अवकाशातून हा उपग्रह पाहणे व त्याची जागा निश्चित करणे शक्य होणार आहे. याचा उपयोग इतर उपग्रहांना देखील होणार आहे.

डॉ. गाडे म्हणाले, नासातर्फे (दि नॅशनल एरोनॉटिक्स अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) नुकत्याच इक्विसॅट या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले असून या उपग्रहाच्या निर्मितीमध्ये आनंदने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. इक्विसॅट या प्रकल्पासाठी एकूण पाच गट कार्यरत होते. त्यापैकी  एका विद्यार्थ्यांच्या गटाचे नेतृत्व आनंदने केले. त्यांच्या गटाने मुख्यत: सौरऊर्जा आणि बॅटरी निर्मितेचे काम पाहिले. सध्या आनंद इंजिनियरिंग रीसर्च असिस्टंट म्हणून ब्राउन युनिव्हर्सिटी येथे कार्यरत असून भविष्यात त्याला स्टॅनफर्ड विद्यापीठातून सौरऊर्जा या विषयात पीएच. डी. करायची आहे.