केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या जहरी टीकेनंतर शरद पवार गटाबरोबर आता अजित पवार गटाच्या आमदारांनीदेखील भाजपासह अमित शहा यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवार यांच्यावर वारंवार होणाऱ्या टीकेवरून अजित पवार गटाच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली. शरद पवार हे देशाचे नेते असून ते आमचे दैवत आहेत. भाजपाने केलेली टीका योग्य नसल्याचं मत अजित पवारांचे कट्टर समर्थक विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केल आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा – Video : पिंपरीत पादचारी महिलेला कारने उडवले; सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल 

हेही वाचा – नवले पुलाजवळ पोलिसांकडून चोरट्यांवर गोळीबार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपाचे नेते अमित शहा यांनी पुण्यातील मेळाव्यात शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार आहेत, अशी जहरी टीका केली होती. यावरून आता शरद पवार गटाबरोबरच अजित पवार गटाच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमदारांना बनसोडे म्हणाले, शरद पवार हे देशाचे नेते आहेत. ते भाजपनेही कबुल केलेलं आहे. भाजपने शरद पवारांचा आदरच केला पाहिजे. पुढे ते म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील शरद पवार हे माझे गुरू आहेत, असं म्हटलं होतं. यावरून भाजप नेते अमित शहा यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, ते योग्य नाही, अशी नाराजी अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केली.