वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्था आणि महर्षी अण्णासाहेब पटवर्धन पुरस्कार समितीतर्फे मुंबई येथील वैद्य शुभदा पटवर्धन यांना महर्षी अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार जाहीर झाला आहे. २५ हजार रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 पटवर्धन बाग येथील धन्वंतरी सभागृह येथे मंगळवारी (२६ नोव्हेंबर) सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार समितीचे अध्यक्ष वैद्य स. प्र. सरदेशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये विविध पुरस्कारांची निवड करण्यात आली. प्रत्येकी पाच हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
संस्थेतर्फे देण्यात येणारे अन्य पुरस्कार पुढीलप्रमाणे : वैद्य पुरुषोत्तमशास्त्री नानल चरक पुरस्कार – पवनकुमार गोदतवार (जयपूर), वैद्य द. वा. शेंडे रसौषधी पुरस्कार – भरत राठी (बुलडाणा), वैद्य वि. म. गोगटे वनौषधी पुरस्कार – संजय तळगावकर (मुंबई), वैद्य यादवजी त्रिकमजी ग्रंथ पुरस्कार – समर्थ कोटस्थाने (पुणे), वैद्य बाळशास्त्री लागवणकर पंचकर्म पुरस्कार – सुबोध पाटील (धुळे), वैद्य बापूराव पटवर्धन सुश्रुत पुरस्कार – राजेंद्र आमीलकंठवार (नांदेड), वैद्य भा. गो. घाणेकर अध्यापन पुरस्कार – विजय पात्रीकर (नागपूर), वैद्य मा. वा. कोल्हटकर संशोधन पुरस्कार – प्रदीप आगळे (कोल्हापूर), वैद्य लक्ष्मीबाई बोरवणकर स्त्री वैद्य पुरस्कार – वैशाली नागले (ठाणे), वैद्य शंकर दाजीशास्त्री पदे कार्यकर्ता पुरस्कार – संजय माळी (जळगाव), पूज्य पादाचार्य रचनात्मक कार्य पुरस्कार – वीणा देव (नागपूर), डॉ. वा. द. वर्तक वनमित्र पुरस्कार – डॉ. दिगंबर मोकाट (पुणे).