पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमध्ये अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला आहे. उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या निगडी प्राधिकरण येथे हा दरोडा टाकण्यात आला आहे. पिस्तुलाचा धाक दाखवून हा दरोडा टाकण्यात आला आहे. सुदैवाने यात दरोडेखोरांनी कुणालाही जखमी केलं नाही.

रात्री नऊच्या सुमारास निगडी प्राधिकरण येथे अज्ञात पाच जणांच्या टोळीने दरोडा टाकला. बंगल्यातील केअर टेकर आणि त्याच्या कुटुंबाला पाठीमागे असलेल्या खोलीत तोंडाला आणि हात, पायाला सेलो टेपने बंद करून डांबून ठेवलं. बंगला मालकालादेखील पहिल्या मजल्यावरील रुमध्ये हात बांधून बंद केलं. घरातील दरोडेखोरांनी कपाट उचकटून घरातील सोने, चांदीचे दागिने असा साडेसहा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. बंगला मालकाने बाल्कनीत येऊन आरडाओरडा केल्याने दरोडा टाकल्याचे नागरिकांना समजलं. नागरिकांनी तातडीने पोलिसांना बोलावले. तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते. सुदैवाने यात कुणीही जखमी नाही. पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.