पिंपरी-चिंचवडमधील औंध लष्करी वसाहतीमध्ये राहणाऱ्या जवानाच्या पत्नीने गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे. स्वाती अमोल जगदाळे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे जवानाच्या पत्नीने आत्महत्या करण्याची या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध येथील लष्करी वसाहतीमध्ये  राहत्या घरात १९ जूनला मध्यरात्री एकच्या सुमारास स्वाती जगदाळे (वय २७) हिने गळफास लावून घेतला. त्यावेळी पती नोकरीवर गेले होते. गळफास न लागल्याने त्यातून त्या बचावल्या. त्यानंतर त्यांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गुरुवारी उपचारदम्यान स्वाती यांचा मृत्यू झाला. पती अमोल यांना दारुचे व्यसन होते. तसेच अमोल परस्त्रीशी व्हॉटसअॅपवर चॅट करत असल्याच्या संशयावरून पत्नी स्वाती हिने गळफास लावून आत्महत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मयत स्वाती हिला दोन मुले आहेत. हे दाम्पत्य मुळचे सांगोडे, ता पुरंदर. जिल्हा पुणे येथील आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यापूर्वी २० जून रोजी नवी सांगवी येथे जवानाच्या पत्नीने गळफास घेऊन आयुष्य संपविले होते. ज्योती मागोकर (वय २२ रा.संत तुकाराम नगर) असे आत्महत्या केलेल्या जवानाच्या पत्नीचे नाव होते. या दोन घटनांशिवाय भोसरी येथील इंद्रायणी नगरमधील आईने आपल्या पाच वर्षांच्या मुलीची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली होती. कौमुदी इसप्पन असे या महिलेचे नाव होते. आठवड्याभरात पिंपरी- चिंचवड परिसरातील आत्महत्येची ही तिसरी घटना आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Army man wife commits suicide suspicion of husband whatsapp chatting with another woman from pimpari chinchwad
First published on: 23-06-2017 at 11:03 IST