पिंपरी-चिंचवड : मधील कला शिक्षकाची अयोध्येतील ‘अमृत महोत्सवा’च्या उपक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. हा उपक्रम अयोध्येत राबवण्यात येणार असून प्रभू श्रीराम यांच्या मंदिरासाठी योगदान देणाऱ्या स्वामी रामभद्राचार्य यांच्या संस्थेकडून हा उपक्रम राबवला जात आहे. यासाठी देशातील २० चित्रकारांची निवड करण्यात आली आहे. त्या वीस चित्रकारांमध्ये पिंपरी- चिंचवडच्या दिलीप माळी यांना देखील स्थान मिळाले आहे

ते गेली वीस वर्षे झालं चित्रकारिता करत आहेत. थेरगाव च्या प्रेरणा शाळेत ते कला शिक्षक म्हणून कार्यरत देखील आहेत. ऐन अयोध्येत त्यांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळाल्याने दिलीप माळी हे खूप आनंदी असून ते भारावून गेले. त्यांनी हे श्रेय त्यांच्या आई आणि पत्नीला दिले आहे.

Chillar Party, Chillar Party Celebration Twelfth Anniversary, Special Children Film Screening , Chillar Party with Special Children Film Screening, Special Children Film Screening in Kolhapur, Kolhapur news, children special film Kolhapur, Kolhapur news, Chillar Party news, marathi news,
चिल्लर पार्टीचा बारावा वर्धापन दिन दुर्गम वाड्यावस्त्यांतील मुलांसोबत
Kolhapur, Kolhapur lok sabha,
उद्योजक ते कलाकार… कोल्हापुरात सारेच प्रचारात
documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!

हेही वाचा…श्रीराम वस्त्र पूजन सोहळ्यानिमित्त डेक्कन जिमखाना भागात वाहतूक बदल

२२ जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मंदीराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यादरम्यान , स्वामी रामभद्राचार्य यांच्या रामानंद मिशन विश्वस्त संस्थेने ‘अमृत महोत्सव’ आयोजित केला आहे. देशभरातून २० चित्रकारांची लाईव्ह पेंटिंगसाठी निवड करण्यात आली असून यात कलाशिक्षक दिलीप माळी यांचा समावेश आहे. दिलीप माळी यांना चित्रकलेचा प्रदीर्घ अनुभव आहे. अयोध्येत त्यांना त्यांची कला सादर करण्यासाठी मिळाल्याने माळी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

याच श्रेय आई आणि पत्नीला दिले असून हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले, दिलीप माळी हे भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. वाची आर्ट गॅलरी, मुंबई यांच्या चित्रकार निवड चाचणीतून कलाशिक्षक दिलीप माळी यांची निवड झाली. अयोध्येत श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यादरम्यान ते मंदिर परिसरात लाईव्ह पेंटिंग साकारणार आहेत.

हेही वाचा…मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातात घट; महामार्ग पोलीस, आरटीओकडून जनजागृती कार्यक्रम सुरू

देशातील वीस चित्रकार श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा प्रत्येक्ष डोळ्याने अनुभवणार असून ते त्यांच्या चित्रकलेच्या माध्यमातून कागदावर रेखाटणार आहेत. खर तर हे खूप आव्हानात्मक असून त्याची उत्सुकता असल्याचं दिलीप माळी यांनी सांगितलं आहे. माळी हे मूळचे कऱ्हाड तालुक्यातील ओंड या गावचे.

बेळगाव येथे ए.टी. डी. आणि पुढे अभिनव महाविद्यालयातून जी. डी .आर्ट, ए. एम. पूर्ण केले आहे. आजपर्यंत वैश्विक आर्ट गॅलरी, जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई, वाची आर्ट गॅलरी, बालगंधर्व कलादालन, नेहरू सेंटर, मुंबई, ललित कला अकॅडमी दिल्ली येथे त्यांच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत.