पुणे : आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे जयपूर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांना यंदाचा ‘वत्सलाबाई जोशी पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवां’तर्गत ‘अंतरंग’ उपक्रमात ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया, सरोदवादक केन झुकरमन, स्वामी कृपाकरानंद आणि ओडिसी नृत्यांगना रीला होता यांच्या मुलाखती होणार आहेत.

महोत्सवाचा भाग म्हणून ‘षड्ज’ आणि ‘अंतरंग’ हे उपक्रम ११ डिसेंबरपासून गणेशखिंड रस्त्यावरील सवाई गंधर्व स्मारक येथे चार दिवस दररोज सकाळी दहा ते बारा या वेळात होणार आहेत, अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी गुरुवारी दिली.

पं. फिरोज दस्तूर, पं. रविशंकर, डॉ. वसंतराव देशपांडे आणि उस्ताद अल्लारखाँ यांच्या प्रकाशचित्रांचे प्रदर्शनही यंदा भरविण्यात आले आहे.