पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर यंदाही ‘ओम् नमस्ते गणपतये ओम गं गणपतये नम: मोरया, मोरया’च्या जयघोषाने तब्बल २५ हजारहून अधिक महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून स्त्री शक्तीचा जागर केला. पारंपरिक वेशात पहाटे चार वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरीता हजेरी लावण्यास सुरुवात केली. गणरायाच्या नामाचा जयघोष करत ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या महिलांचा आनंदही पाहण्याजोगा होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने ट्रस्टच्या १२६ व्या वर्षानिमित्त आयोजित अथर्वशीर्ष पठण सोहळ्यास फिनोलेक्स ग्रुपचया रितू छाब्रिया, वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, आमदार नीलम गोऱ्हे, एमएनजीएलचे सुनील सोनटकके, ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, अरुण भालेराव, शुभांगी भालेराव यांसह महिला कार्यकर्त्या आणि ३० देशातील परदेशी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

वाचा : बाप्पा मोरया : आम्ही चालवू हा पुढे वारसा…..

दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाडयापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणाकरीता गर्दी केली. भक्तीरसात तल्लीन झालेल्या वातावरणातील या उपक्रमाचे ३२ वे वर्ष होते. तब्बल ३२ वर्षांपूर्वी महिलांचा सहभाग या गणेशोत्सवात असावा. याकरीता ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब गोडसे यांनी या उपक्रमाला सुरुवात झाली. केवळ १०१ महिलांपासून सुरु झालेल्या उपक्रमात आज  २५ हजारहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.

मराठीतील सर्व गणेशोत्सव २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atharvashirsha chanting took place in shrimant dagdusheth halwai ganpati temple area pune ganeshotsav
First published on: 14-09-2018 at 10:29 IST