पुण्यातील बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे होळी पौर्णिमेनिमित्त श्री दत्त मंदिरात १०० किलो द्राक्षांची आकर्षक आरास करण्यात आली. द्राक्षांचे घड, विविध प्रकारची पाने व फुलांचा वापर करुन ही सजावट साकारण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंढरपूर येथील व्यावसायिक प्रकाश कुलकर्णी यांच्यातर्फे ही आरास करण्यात आली. सुभाष सरपाले यांनी सजावट केली होती. होळी पौर्णिमेनिमित्त साकारलेली आरास सोमवार, दिनांक २९ मार्चपर्यंत असणार आहे. तर, होळीनिमित्त ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग काळकर यांच्या हस्ते दत्तयाग होणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attractive decoration of 100 kg of grapes on the occasion of holi at lakshmibai dagdusheth datta mandir msr 87 svk
First published on: 27-03-2021 at 19:43 IST