जबाबदार अधिकारी, ठेके दारांवर कारवाईची स्वयंसेवी संस्थांकडून मागणी

पुणे : शहरात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रस्त्यांची मोठय़ा प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. रस्ते खोदाईनंतर ते पूर्ववत करताना अशास्त्रीय पद्धतीचा वापर झाल्यानेच पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जबाबदार अधिकारी आणि ठेके दारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने महापालिका आयुक्त विक्रम कु मार यांच्याकडे के ली आहे.

महापालिके ने खासगी मोबाइल कं पन्यांबरोबरच शासकीय यंत्रणांना एप्रिल-मे महिन्यात सेवा वाहिन्या टाकण्यासाठी परवानगी दिली होती. तसेच महापालिके च्या पाणीपुरवठा, पथ विभाग आणि मल:निस्सारण विभागाकडूनही रस्त्यांची विविध कामांसाठी मोठय़ा प्रमाणावर खोदाई करण्यात आली होती. रस्ते खोदाईमुळे नागरिकांना त्रास होत असल्याचे पुढे आल्यानंतर रस्ते दुरुस्तीची कामे महापालिके च्या पथ विभागाने तातडीने हाती घेतली. मात्र रस्ते पूर्ववत करताना ते शास्त्रीय पद्धतीने करण्यात आले नव्हते, ही बाब सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी दोन जून रोजी महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली होती.

मात्र आता पावसाने रस्ते दुरुस्तीचा दावाही फोल ठरल्याने नागरिकांच्या करातून जमा झालेल्या पैशाचा अपव्यय होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात विवेक वेलणकर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले असून जबाबदार अधिकारी तसेच ठेके दारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी के ली आहे.

ज्या ठिकाणी रस्ते खोदण्यात आले तेथे थातूरमातून पद्धतीने दुरुस्ती करण्यात आली. आता पुन्हा या रस्त्यांची दुरुस्ती करावी लागणार आहे. ही दुरुस्तीही तात्पुरती असल्याने पुढील पावसात रस्त्यावर पुन्हा खड्डे पडण्याची शक्यता आहे. यामध्ये करदात्यांच्या कराचे पैसे खडय़ात जाणार असून नागरिकांनाही त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे वेलणकर यांनी सांगितले.