बाईक टॅक्सीच्या विरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ (आरटीओ) आंदोलन करुन वाहतुकीस अडथळा निर्माण केल्या प्रकरणी अटकेत असलेल्या रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह ३७ जणांना शनिवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. शिरसाळकर यांनी जामीन मंजूर केला.

हेही वाचा- पुणे : लोकसभा अध्यक्षांकडून गिरीश बापट यांच्या तब्येतीची चौकशी

RBL Bank Fraud Case, 11 Including Senior Officers Booked, Rs 12 Crore Scam, rbl bank scam, rbl bank scam Rs 12 Crore , Senior Officers in RBL Bank scam, Mumbai news,
आरबीएल बँकेची १२ कोटींच्या फसवणूक केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांसह ११ जणांवर गुन्हा, बँकेच्या दक्षता विभागाची तक्रार
mumbai traffic police marathi news
मुंबई: बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम, २ हजार १८९ दंडात्मक कारवाया
BJP candidate Ramdas Tadas has two offices in the city without obeying the order of Amit Shah
अमित शहांचा आदेश पाण्यात, भाजप उमेदवाराची शहरात दोन कार्यालये
Trinamool Congress MPs protesting in front of the Central Election Commission headquarters protested at the police station
तृणमूलचे ‘राजकीय नाटय़’; केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात पोलीस ठाण्यात २४ तास ठिय्या आंदोलन

या प्रकरणी बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डाॅ. केशव क्षीरसागर, आम आदमी रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष आनंद अकुंश, पुणे जिल्हा वाहतूक सेवा संघटनेचे अध्यक्ष संजय कवडे, शिवनेरी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अशोक साळेकर, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष किशोर चिंतामणी, आरपीआय वाहतूक आघाडी अध्यक्ष अजीज शेख, पी आर्शिवाद संघटनेचे अध्यक्ष फारुख बागवाले, एआयएमआयएम रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष बाबा सय्यद, शिवा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष शिवा भोगनळी यांच्यासह ३७ जणांना शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आदेश धुडकावून १२ डिसेंबर रोजी आरटीओ चौकात चक्का जाम आंदोलन केले होते. त्या मुळे शहरात वाहतूक कोंडी झाली हाेती.

हेही वाचा- आंतरराष्ट्रीय प्रवाशांची पुणे विमानतळावर तपासणी सुरू

आंदोलनकर्त्या रिक्षाचालकांच्या विरोधात दाखल गुन्ह्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचे कलम लागू होत नाही. रिक्षाचालकांकडून काही मुद्देमाल जप्त करण्यात आला नाही, असा युक्तीवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. आंदोलनकर्त्या रिक्षाचालकांकडून ॲड. श्रीधर हुद्दार यांनी जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालायने बचाव पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून रिक्षाचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह ३७ जणांचा जामीन मंजूर केला.