खासदार गिरीश बापट गेल्या काही महिन्यांपासून श्वसनाच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी खासगी रुग्णालयात खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

हेही वाचा– कुस्ती परिषदेतील वादावर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “दुर्देवाने…”

kolhapur mla prakash awade, claim on hatkanangale lok sabha seat
“मी महायुतीचाच! मोदींना पंतप्रधान करण्यासाठी लढणार”, बंडखोर आमदार प्रकाश आवाडे यांचा पवित्रा
Tanaji Sawant, Archana Patil, Tanaji Sawant silence,
अर्चना पाटील उमेदवारीनंतर समर्थकांच्या आंदोलनावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे मौन
Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा
Verbal dispute between BJP MLA sanjay Kute and Sena MLA Sanjay Gaikwad
“सकाळी अर्ज भरला अन संध्याकाळी…”, भाजपचे आमदार कुटे व सेनेचे आमदार गायकवाड यांची शाब्दिक जुगलबंदी

गेल्या काही दिवसांपासून खासदार गिरीश बापट उपचारांसाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आणि सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बापट यांची नुकतीच भेट घेतली होती. त्यानंतर आता लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही बापट यांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली. बिर्ला शनिवारी पुणे दौऱ्यावर आले होते. शहरातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर त्यांनी बापट यांची भेट घेतली.

हेही वाचा-

बिर्ला यांनी खासगी रुग्णालयात बापट यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. लवकर बरे होण्यासाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या. तसेच बापट यांच्यावरील उपचारांबाबत डॉक्टरांशी चर्चाही केली.