‘बॅटमॅन’ या हॉलिवूडपटातील बॅटमॅनची ‘सुपर कार’ ही अनेकांच्या कुतुहलाचा विषय आहे. अशीच एक ‘बॅटमोबाईल’ सदृश्य कार पुण्यातील रस्त्यावरून धावताना दिसत असून, अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. वर्दळीच्या ठिकाणी धावणारी ही गाडी पाहताच स्मार्ट फोनमधील कॅमेरे सरसावत गाडीची एक झलक कॅमेऱ्यात टिपण्यासाठी पुणेकर एकच झुंबड करताना दिसताहेत. ‘बॅटमोबाईल’ची प्रतिकृती असलेली ही गाडी सोशल मीडियावरदेखील अवतरली आहे. जगभरात अनेक ठिकाणी ‘बॅटमोबाईल’ सदृश्य कार रस्त्यावरून धावताना पाहाण्यात आल्या असल्या, तरी भारतातील रस्त्यावरून ती पहिल्यांदाच धावताना दिसत आहे. बॅटमॅनच्या पोशाखातील व्यक्ती ही गाडी चालवत असून, ही व्यक्ती कोण आहे ते अद्याप कळू शकलेले नाही. पुणेकरांमध्येदेखील चालकाविषयी कुतुहल वाढत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Batman fans head to pune now heres why
First published on: 03-07-2015 at 06:13 IST