लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिकोना किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या तीन वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तरुणां पैकी एकाचा हेडफोन घेत असताना पाय घसरून थेट २५० फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला झाल्याची घटना समोर आली आहे. हार्दिक माळी असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो तळेगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक माळी हा तरुण त्याच्या दोन मित्रांसह तिकोना किल्ल्यावर फिरण्यासाठी गेला होता. तेव्हा, तिघे ही दरीच्या दिशेने फिरण्यास गेले होते. त्यावेळी फोटो काढून सर्व जण वर आले. परंतु, मयत हार्दिक चा हेडफोड येत असताना कुठे तरी पडला. तो परत दरीच्या दिशेने खाली गेला. हेडफोन घेत असताना त्याचा पाय घसरला आणि तो अडीचशे फूट खोल दरीत पडला. ही घटना बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेत हार्दिक चा मृत्यू झाला आहे. ही सर्व घटना दोन्ही मित्रांच्या समोर घडली आहे. अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.

घटनास्थळी लोणावळा ग्रामीण पोलीस गेले. दरम्यान, अडीचशे फूट खोल दरीतील मृतदेह काढण्यासाठी शिवदुर्ग टीम ला बोलावण्यात आले. टीममधील ओंकार पडवळ, रितेश कुडतरकर, हर्ष तोंडे, अनिल आंद्रे, शुभम आंद्रे, चंद्रकांत बोंबले, अशोक उंबरे, मनोज वरे, बाळू वरे, अजय शेलार, सतिश मालगोडे, राजेंद्र कडु, अनिल सुतार, आनंद गावडे, सुनिल गायकवाड हे सर्व जण अडीचशे फूट खोल दरीत खाली उतरले आणि मृतदेह शोधला. मृतदेह काढण्यासाठी तब्बल साडेचार तास लागले. पोलीस निरीक्षक घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी बाबर, पोलीस नाईक शेळके, पोलीस कर्मचारी मुलानी यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह वर काढण्यास मदत केली.