“हे तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारं,” पुण्यात महिला सरपंचाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून मारहाण

घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता महिला सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण करत असल्याचं दिसत आहे

BJP, Chitra Wagh, NCP, Woman Sarpach
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता महिला सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण करत असल्याचं दिसत आहे

पुण्यात महिला सरपंचाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील कदमवाकवस्ती भागात लसीकरण केंद्रात ही घटना घडली आहे. घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता महिला सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण करत असल्याचं दिसत आहे. भाजपा उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी यावरुन संताप व्यक्त केला असून हे धक्कादायक चीड आणणारं आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारं असल्याचं म्हटलं आहे.

“पुण्याजवळील कदमवाकवस्ती गावच्या लोकनिर्वाचित सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण झाली आहे. मारहाण करणारा कोण? तर तो आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा,” अशी माहिती चित्रा वाघ यांनी दिली आहे.

चित्रा वाघ यांनी व्हिडीओ ट्वीट केला असून, “गृहखातं ज्या पक्षाकडे त्या पक्षाच्या आमदार व कार्यकर्त्यांना महिला अधिकाऱ्यांना गलीच्छ शिवीगाळ करणे त्यांना ॲट्रोसिटीच्या धमक्या देणे महिला सरपंचाला मारहाण करणे याचं लायसन्स दिलयं का ??,” अशी विचारणा केली आहे.

“मुख्यमंत्री महोदयजी हे धक्कादायक चीड आणणारं आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारं आहे,” असंही यावेळी त्यांनी म्हटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjp chitra wagh tweets video ncp activist attack woman sarpach in pune sgy