राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
पुणे: राष्ट्रवादी पार्टी ही एका माणसाची पार्टी आहे.त्या पार्टीमध्ये सर्वांनी एका रांगेत बसायचे,फार स्वतः चे मत व्यक्त करायचे नाही आणि पार्टीचा जो मुख्या आहे तो देईल ते घ्यायचे,पार्टी उभा करायला आयुष्य घालवले त्यामुळे त्याच ऐकलेल चालेल,पण आता त्यांच्या कन्या आल्या आहेत त्या खूप तापट आहेत.त्या म्हणतात की,माझ्या बापाची पार्टी आहे.मी कोणाचाच नाव घेत नाही.त्यामुळे माझ्यावर कोणी केस दाखल करू शकत नाही.अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच नाव न घेता, पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांच्यावर निशाणा साधला.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, आज भाजपमध्ये काहींनी प्रवेश केला आहे. त्या सर्वांचे मी स्वागत करतो. ज्या पक्षातून आपण आलात, त्या काँग्रेस पक्षाचे राजकुमार आहेत. त्यांचा पत्ता कुठेच नसतो .ते काय बोलतात, त्याचा पत्ता नसतो.त्यामुळे त्यांच्या पार्टीमधील २३ सिनियर नेत्यांनी,त्यांच्या अम्माला (सोनिया गांधी ) एक पत्र लिहिले.सोनिया माता आपल्या पार्टीच कस व्हायचे, असे म्हणत त्यांनी राहूल गांधी यांच्यावर टीका केली.
तसेच ते पुढे म्हणाले की, आता तिसरी एक पार्टी आहे. त्या पार्टीमध्ये आजोबांच, वडीलांच प्रचंड कर्तुत्व, स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल कोणाच्याच मनात शंकाच नाही.परंतु त्यानंतर काय चाललय, खुर्चीसाठी काहीही असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी देखील निशाणा साधला.
तसेच ते पुढे म्हणाले की,काँग्रेस पार्टी कोणाची पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, राहुल गांधी आणि सोनिया गांधी, त्यानंतर शिवसेना कोणाची बाळासाहेब ठाकरे,उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेची, आता राष्ट्रवादी कोणाची शरद पवार,सुप्रिया सुळे आणि अजित पवारांची आणि ही पार्टी मोदींची, अटलजीची नाही. तर ही कार्यकर्त्यांची पार्टी असल्याचे सांगत काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन ही पक्षाच्या नेतृत्वावर त्यांनी टीका केली आहे.