‘ब्लू मॉरमॉन’ हे राज्य फुलपाखरू म्हणून निवडण्यात आले खरे, पण अभ्याकांनी त्याची दुसरी बाजू उजेडात आणली आहे. ती म्हणजे हे फुलपाखरू लिंबू व संत्रावर्गीय वनस्पतींवर तण म्हणून जगते. त्यामुळे ते राज्य फुलपाखरू ठरल्यामुळे विदर्भातील संत्राउत्पादकांच्या चिंता वाढण्याची भीतीही अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
राज्य वन्यजीव मंडळाची बैठक गेल्या सोमवारी नागपूर येथे झाली. त्यात ‘ब्लू मॉरमॉन’ला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करण्यात आले. मात्र, या निर्णयावर फुलपाखरांच्या अभ्यासकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि परिपूर्ण माहिती न घेताच हा निर्णय घेतला असल्याची टीका त्यांनी केली आहे. ईशान्य भारत हे फुलपाखरांचे नंदनवन. तेथील प्रसिद्ध भीमताल तलावाजवळील फुलपाखरू संशोधन केंद्रातील अभ्यासक पीटर स्मेटासेक यांनी याबाबत भूमिका घेतली आहे. विविध पर्यावरण अभ्यासक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ते या गोष्टीचा प्रसार करत आहेत. त्यांची ही भूमिका व्हॉट्स अ‍ॅपच्या विविध ग्रुपमध्ये पसरवली जात आहे.
पीटर यांनी म्हटले आहे, की ‘ब्लू मॉरमॉन’ ला राज्य फुलपाखरू घोषित करण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय परिपूर्ण अभ्यासावर आधारित नाही. हे फुलपाखरू लिंबू (संत्रा)वर्गीय वनस्पतींवर तण म्हणून जगते. त्यामुळे उत्पादनात घटही येते. या फुलपाखराचा उपद्रव वाढल्यास संत्रा, लिंबू यांचे पीक घेणारे शेतकरी त्याच्या वर नियंत्रण आणण्यासाठी कोणताही मार्ग अवलंबू शकणार नाहीत. या निर्णयाबाबत ज्या कोणी आग्रह धरला असेल, त्यांना वन्यजीवांबाबत फारशी माहिती असल्याचे दिसत नाही. महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यांनी तरी अपुऱ्या माहितीच्या आधारे असा निर्णय घेऊ नये.
पीटर यांच्यासोबत विदर्भातील काही अभ्यासकही ही माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यात गुंतले आहेत. सरकारच्या निर्णयाचे काय होणार याची कल्पना नाही, पण या फुलपाखराबाबत वस्तुस्थिती तरी लोकांपर्यंत पोहोचायला हवी, अशी प्रतिक्रिया काही अभ्यासकांनी दिली.

Ravikant Tupkar, Ravikant Tupkar marathi news,
राज्यात नवी राजकीय आघाडी! रविकांत तुपकर यांची मोर्चेबांधणी; पुण्यात पदाधिकाऱ्यांची…
A History of Geography A Rainy Road to Prosperity
भूगोलाचा इतिहास: समृद्धीचा पर्जन्यमार्ग
bjp suffered from overconfidence in lok sabha elections says up cm yogi adityanath
अतिआत्मविश्वासाचा फटका! प्रदेश भाजपच्या बैठकीत योगी आदित्यनाथ यांचे आत्मपरीक्षण
Odisha Governor Raghubar Das son assault
आलिशान गाडी पाठवली नाही म्हणून राज्यपालांच्या मुलाची अधिकाऱ्याला बेदम मारहाण
job opportunities in punjab national bank
नोकरीची संधी : पंजाब नॅशनल बँकेतील संधी
readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles readers reaction on loksatta
लोकमानस : राज्यात आर्थिक अराजकाची नांदी       
sharad pawar criticized on government schemes over implementation
सरकारच्या योजना फसव्या, लागू होण्याबाबत शंका – शरद पवार
Uddhav Thackeray in trouble The investigation into the allegations against the Election Commission is underway
राज्यातील ओबीसी-मराठा वादावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “जर आरक्षणासाठी…”