scorecardresearch

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात, सुदैवाने चालक बचावला

चालक गंभीर जखमी

car accident, mumbai pune expressway, driver injured,marathi news, marathi, Marathi news paper, Marathi news online, Marathi Samachar, Marathi latest news,news, entertainment marathi news, Bollywood news, Sports news in marathi, Health news, political news in marathi,breaking news,marathi batmya
वाहनचालक गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील दोन अपघातामध्ये एकूण १२ जणांनी जीव गमावल्याची घटना ताजी असताना मुंबई-पुणे द्रुगती महामार्गावर अपघात घडला. हा अपघात हृदयाचा ठोका चुकवणारा असाच होता. अपघातामध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी यात चालकाशिवाय कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. वाहन चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील कामशेतजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या घटनेमध्ये चालक गंभीर जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  रविवारी सायंकाळी ५ च्या सुमारास हा अपघात घडला. मुंबईवरून पुण्याच्या दिशेने येताना झालेल्या या भीषण अपघातावेळी गाडीमध्ये फक्त चालक होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, घटनस्थळी महामार्ग पोलीस सहायक रमेश पोटे आणि पथकाने धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या कार चालकाला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून करचालकाचा जीव वाचला आहे. अपघातात गाडीची अवस्था पाहिल्यानंतर चालकाचे प्राण वाचले यावर कदाचित विश्वासच बसणार नाही. पण सुदैवाने त्याचे प्राण वाचले आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-06-2017 at 20:38 IST
ताज्या बातम्या