कामावरून काढून टाकले म्हणून ड्रायव्हरने पेटवून दिल्या मालकाच्या २२ लाखांच्या गाड्या

आरोपी विनोद भस्के हा फिर्यादी यांच्याकडे गेल्या तीन वर्षांपासून वाहनचालक (ड्रायव्हर) म्हणून काम करत होता

पिंपरी-चिंचवड शहरात कामावरून काढून टाकल्याच्या रागातून तरुणाने आणि त्याच्या भावाने क्रेटा आणि इनोव्हा अशा २२ लाखांच्या मोटारी पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ६० वर्षीय महिलेने भोसरी MIDC पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद किसनराव भस्के अस वाहन चालकाचे नाव असून त्याला काही महिन्यांपूर्वी कामावरून काढून टाकण्यात आले आहोत. तर, अंकित किसनराव भस्के असे त्याच्या भावाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनोद भस्के हा फिर्यादी यांच्याकडे गेल्या तीन वर्षांपासून वाहनचालक (ड्रायव्हर) म्हणून काम करत होता. दरम्यान, विनोद याने फिर्यादी यांची दुसरी मोटार (स्विफ्ट) ही गावाकडे जायचं म्हणून दहा दिवसांसाठी घेऊन गेला. मात्र, महिना झाला तरी मोटार आणून दिली नाही. त्यामुळं फिर्यादी यांनी त्यांचा शोध घेऊन ते त्याच्या घरापर्यंत पोहचले.

मोटारी विषयी विचारले तेव्हा त्याचा भाऊ अंकित याने त्यांच्याशी वाद घातला, असे फिर्यादीत म्हटलं आहे. नंतर तीच स्विफ्ट आरोपीने नुकसान करून आणून दिले असल्याचं फिर्यादीने म्हटलं आहे. त्यानंतर विनोदला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी आरोपी विनोद आणि त्याचा भाऊ अंकित यांनी फिर्यादी राहात असलेल्या सोसायटीमध्ये जाऊन क्रेटा आणि इनोव्हा गाड्या पेटवून दिल्याचा आरोप केला आहे.

दोन्ही मोटारी जळून खाक झाल्या असून तब्बल २२ लाखांचं नुकसान झाले आहे. या घटनेप्रकरणी भोसरी MIDC पोलीस अधिक तपास करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Car burnt by driver because boss dismissed him vsk 98 kjp