पिंपरीतील अशोक सर्वागीण सोसायटीच्या वतीने केंद्रीय श्रम व रोजगारमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांना अशोकरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. कर्नाटकात गुलबर्गा येथील चित्तापूरमध्ये रविवारी (२६ मे) हा कार्यक्रम होणार आहे.
राजस्तानच्या ज्येष्ठ साहित्यिका डॉ. कुसुम मेघवाल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात पाचव्या अशोकस्तंभाचे उद्घाटन खर्गे यांच्या हस्ते होणार असून सम्राट अशोक यांच्या प्रतिमेचे उद्घाटन डॉ. प्रशांत पगारे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले उपस्थित राहणार आहेत. दुपारच्या सत्रात महिंद्र शेगावकर यांचे ‘सम्राट अशोक यांच्या विश्व धम्म विस्तार’ या विषयावर व्याख्यान होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अशोक शिलवंत यांनी दिली.