लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी संगणकीय प्रणालीतील सांकेतिक शब्दाचा गैरवापर करुन जन्म दाखल्यातील नावात बदल करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महापालिकेकडून फरासखाना पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे.

Indegene IPO is open for investment from May 6 eco news
इंडेजीनचा ‘आयपीओ’ ६ मेपासून गुंतवणुकीस खुला
Liquor license, lok sabha election 2024, wife of sandipan Bhumre, mahayuti, chhatrapati sambhaji nagar
भूमरेंच्या पत्नीच्या नावेही मद्य परवाना
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश

आणखी वाचा-पिंपरी : प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाईचा दंडुका, तीन दिवसांत ३० लाख दंड वसूल

कसबा पेठेतील महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयातील अधिकारी डॉ. अरविंद मखर यांनी याबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या ढोले-पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजाता माने यांच्या सांकेतिक शब्दाचा गैरवापर करुन अज्ञाताने संगणकीय प्रणालीत फेरफार केला. एका जन्म दाखल्यात वेदांश मोहन गुप्ता असे नाव होते. त्याऐवजी मोहम्मद असे नाव टाकण्यात आले. सांकेतिक शब्दाचा गैरवापर करुन जन्मदाखल्यातील नावात फेरफार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा तपास करत आहेत.