पिंपरी : आई एकविरा गडावरील विविध सुविधांसाठी आराखडा तयार करण्यात आला असून यासाठी ३९ काेटींचा निधी मंजूर केला आहे. आई एकविरा देवीची सेवा करण्याचे भाग्य मिळाले असून मी स्वतःला भाग्यवान समजतो. एकविरा गडावर किती आले, दर्शन घेतले आणि गेले, असा टाेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला.

एकविरा देवी मंदिर जतन, संवर्धन व परिसरातील विविध कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी ( ४ ऑक्टोबर) झाले. खासदार श्रीरंग बारणे, बाळ्यामामा म्हात्रे, दीपक हुलावळे यावेळी उपस्थित हाेते. भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर एकविरा देवीची महाआरती व पूजा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली.

हे ही वाचा…क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईचा संशयास्पद मृत्यू, प्रभात रस्ता परिसरातील घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परिवाराची एकविरा देवी कुलदैवत आहे. परंतू, देवीच्या गडावरील विविध कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाल्यामुळे त्यांनी गडावर किती आले, दर्शन घेतले आणि गेले, असा टाेला ठाकरे यांना उद्देशून लगावला. मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, की एकविरा आईच्या गडावरील दर्जेदार सुविधा असाव्यात. यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी ३९ काेटी रूपये मंजूर केले आहेत. प्राचीन बुध्द लेण्यांचा विकास व्हावा, अशी खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी आहे. यासाठीही पाच काेटी रूपये दिले जाणार आहेत. भाविकांना गडावर येण्यासाठी राेप-वे चे काम हाती घेतले आहे. कार्ला फाट्यावर पुल नसल्यामुळे वारंवार अपघात हाेत आहेत. हे टाळण्यासाठी त्याठिकाणी पुल उभारावा, अशा सूचना दिल्या आहेत. यासाठी ५५ काेटींच्या खर्चाला मान्यता दिली जाईल. पैसे काेठेही कमी पडणार नाहीत, आई एकविराच्या पुण्याईने या भागाचा विकास हाेईल. सर्वसामान्यांचे सरकार असून आईची सेवा करण्याची संधी मिळाली, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजताे.