पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना न्यायालायने जामीन मंजूर केल्यानंतर शहर शिवसेनेच्या वतीने डेक्कन परिसरातील कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला. ढोल-ताशा वाजवत, फटाके फोडत आणि एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची पदोन्नती नाकारलेल्या स्मिता झगडे प्रदीर्घ रजेवर

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर सक्त वसुली संचलनालयाने अटकेची कारवाई केली होती. संजय राऊत यांना जामीन देण्यात येऊ नये, अशी मागणी करणारी याचिका सक्त वसुली संचलनालयाने न्यायालयात दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केला. संजय राऊत यांचा शंभर दिवसानंतर तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात उपस्थित राहिले. शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना पदाधिकारी, महिला मोर्चा पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

हेही वाचा >>>पुणे: केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल दोन दिवसांच्या बारामती दौऱ्यावर

शहर कार्यालयाबाहेर शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर फटाके फोडण्यात आले. ढोल-ताशा वाजवून सुटकेचा आनंद व्यक्त करण्यात आला. पदाधिकाऱ्यांना पेढ्यांचे वाटप करण्यात आले. संजय राऊत यांना जामीन मिळाल्याने शिवसेनेची बाजू पुन्हा आक्रमकपणे मांडली जाईल, असा विश्वास व्यक्त करत राऊत यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: City shiv sena jubilation after sanjay raut bail pune print news amy
First published on: 09-11-2022 at 19:09 IST