पिंपरी महापालिकेतील नोकरभरती आणि पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या पदोन्नतीत कोणत्याही प्रकारे गैरप्रकार झाले नसून याबाबतची सर्व कार्यवाही नियमानुसारच झाली असल्याचा दावा पिंपरी-चिंचवड महापालिकेने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>महापालिकेच्या कचरा गाडीच्या धडकेने तरुणाचा मृत्यू; सिंहगड रस्ता भागातील घटना

पालिकेतील अनेक कामांमध्ये गैरप्रकार झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्याचा संदर्भ देऊन महापालिकेच्या प्रशासन विभागाने भापकर यांना लेखी पत्र पाठवले आहे.

हेही वाचा >>>पुणे : वीज पुरवठा खंडित करण्याची भीती दाखवून महिलेची एक लाखाची फसवणूक

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नोकरभरतीसाठी खासगी कंपनीकडून परीक्षांचे कामकाज करून घेतले जाते. त्यादृष्टीने महापालिकेने कंपनीशी करारनामा केला आहे. याबाबतच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. नोकरभरतीत कोणत्याही प्रकारे नियमबाह्य कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याच्या प्रकरणातही महापालिका अधिनियमानुसार सर्व नियमांचे, निकषांचे पालन करण्यात आले असल्याचे महापालिकेने दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clarification of the municipality after complaints of malpractice in recruitment promotion of pimpri municipality pune print news amy
First published on: 04-11-2022 at 18:01 IST