महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र सोमवारपासून (६ फेब्रुवारी) ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शाळांनी संबंधित प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्याची प्रत विद्यार्थ्यांना द्यायची असून, प्रवेशपत्रासाठी कोणतेही शुल्क घेऊ नये, अशा सूचना राज्य मंडळाने दिल्या.

हेही वाचा >>>अश्विनी जगताप, शंकर जगताप समर्थकांकडून इमेज वॉर!; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

How many candidates appeared in the last offline set exam The set will be held twice a year
शेवटच्या ऑफलाइन सेट परीक्षेला किती उमेदवारांची उपस्थिती? सेट वर्षातून दोनवेळा होणार?
pune set exam marathi news, set exam registration marathi news
‘सेट’ परीक्षेसाठी उमेदवार नोंदणीत वाढ; पारंपरिक पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा
Release of candidates
वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतून उमेदवारांची सुटका, आता एकाच परीक्षेतून प्रवेशाची संधी
Release of candidates
वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतून उमेदवारांची सुटका, आता एकाच परीक्षेतून प्रवेशाची संधी

राज्य मंडळाच्या https://www.mahasscboard.in/ या संकेतस्थळावर शाळा लॉगिनमध्ये प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाईल. प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून, स्वाक्षरी करून प्रत विद्यार्थ्यांना द्यावी. प्रवेशपत्रात विषय, माध्यम बदल असल्यास त्या दुरुस्ती शाळांनीविभागीय मंडळात जाऊन करून घ्यायच्या आहेत. प्रवेशपत्रावरील छायाचित्र, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव या संदर्भातील दुरुस्ती शाळांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची प्रत विभागीय मंडळात सादर करायची आहे.

हेही वाचा >>>पुणे: वैद्यकीय निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; गुन्हा दाखल

प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास पुन्हा प्रत घेऊन त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा नमूद करावा. छायाचित्र सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचे छायाचित्र चिकटवून मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.