पुणे महानगरपालिका क्षेत्रात १६ डिसेंबरपासून इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकांनी याची नोंद घ्याव. असे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.

या संदर्भात माहिती देताना महापौर मुरलीधर मोहळ म्हणाले, “पुणे शहरातील सर्व शाळा या १६ डिसेंबरपासून आपण सुरू करत आहोत. पहिली ते सातवी इयत्तेचे वर्ग हे १६ डिसेंबर रोजी सुरू होत आहेत. हा निर्णय करतान जिल्हाचे पालकमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त सौरभ राव आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार व आमची सगळ्यांची चर्चा झाली आणि हा एकमताने निर्णय घेण्यात आला, की सर्व ज्या काही मार्गदर्शक सूचना करण्यात आलेल्या आहेत, त्या प्रमाणे त्या त्या शाळेमधील सर्व निर्जंतुकीकरण करणे, सोशल डिस्टंसिंगचं पालन योग्य पद्धतीने करणे, जे काही नियम असतील त्यानुसार योग्य पद्धतीने सगळ्या सूचना देऊन, अत्यंत चांगल्या पद्धतीने तिथली सगळी व्यवस्था तयार ठेवून या शाळा आता गुरूवारपासून सुरू होत आहेत.”

तसेच, “यामुळे पुण्यातील शाळा कधी सुरू होणार? हा मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला विषय आता मार्गी लागलेला आहे. गुरूवारपासून महापालिकेच्या हद्दीतील सर्व शाळा सुरू होत आहेत.” असं महापौर मोहळ यांनी सांगितलं.

मुंबईत उद्यापासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरू होणार

मुंबईत उद्या (१५ डिसेंबर) पासून इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा सुरू होत आहेत. कोविड विषयक नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. बृहन्मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्यावतीने या संदर्भात माध्यम परिपत्रक काढण्यात आलेले आहे.